स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२०
मला हा दिवस शाळेतल्या दिवसांची आठवण करून देतो. कडक इस्त्री केलेला शुभ्र युनिफोर्म, पांढरे बूट, लाल रिबिनी बांधून टापटीप वेण्या. साधारण सकाळी सातच्या सुमारास शाळेत हजर राहणे असे सांगितलेले असायचे. शाळेतील आवारही रोजच्या पेक्षा वेगळे सजलेले असायचे. एका बाजूला ध्वजारोहाणा ची तयारी असायची, स्टेज वजा थोडा उंचवटा असायचा; त्यावर शिक्षक आणि पाहुणे मंडळीना बसायला जागा केलेली असायची. माईक आणि स्पीकर इत्यादी तयारी आम्ही पोहोचायच्या आधीच झालेली असायची. त्या दिवशी शिक्षक सुध्या नेहमी पेक्षा वेगळ्याच अविर्भावात दिसायचे. सर्व शिक्षकांनी पांढरा शुभ्र पेहराव केलेला असायचा.
ध्वजारोहाण कोण करणार, त्यानंतर राष्ट्रगीत म्हणणारा समूह कुठे उभा राहणार, मग भाषण, वर्गातील हुशार मुल-मुलींच्या भाषणाची तयारी हे सर्व आदल्या आठवड्यात वर्ग शिक्षक करून घेत असत. खूप शिस्तबद्ध वातावरणात हा दिवस साजरा केला जायचा.
त्या दिवशी ध्वजारोहाणा नंतर राष्ट्रगीत सुरु झाल्यावर अंगावर येणारा शहरा अजूनही आठवतो. आमच्या देवबाईनि बसवलेली देशभक्तीपर गाणी म्हणताना काही तरी व्हायचे ते शब्दात व्यक्त नाही करू शकत.
झ्नेडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा.....
जयोस्तुते श्री म्हन्म्न्गले शिवास्पदे शुभदे.......
हि गीते ऐकली कि अजूनही शाळेतलीच आठवण येते. खुप वेळा तालमी करून जेव्हा चाल अन ताल जुळून यायचा तेव्हा आमच्या देव बाईंचे मन शांत होत असे.
अपनी आझादी को हम हरगिझ मिटा सकते नही, सर कटा सकते हे लेकीन सर झुका सकते नही.
मेरा रंग दे बसंती चोला....
मेरे देश की धरती सोना उगले.....
ए मेरे वतन के लोगो... अशी अनेक देश भक्तीपर गीते आपल्याला सकाळ पासूनच ऐकू येऊ लागतात. ह्या दिवसाचे महत्त्व जेव्हा खऱ्या अर्थाने कळू लागले तेंव्हा या गाण्याचे बोल मनाला हुरहूर लावायला लागले. डोळ्यात अश्रू उभे राहू लागले. प्रत्येक जण या स्वातंत्र्य लढ्यात लढले त्या प्रत्येकला मन नतमस्तक होऊ लागले.
सायमन परत जा...
तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुगा....
जय जवान जय किसान....
स्वराज माझा जन्म सिद्ध अधिकार आहे....
असे म्हणत अनेकांनी आपले प्राण पणाला लावले, संघर्ष केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त एकच ध्यास घेतला तो म्हणजे स्वतंत्र भारताचा. प्रत्येकाची पध्दत वेगळी होती पण प्रत्येकाच्या लढाईचा उद्धेश मात्र एकच होता.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.
भारताच्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते आणि मानवंदना देऊन राष्ट्गीत गायले जाते.
At the stoke of the midnight hour, when the world sleep, India will awake to life and freedom. A moment comes but rarely in history, when we step out from old to the new… India discovers herself again. - Pandit Nehru. हे पंडित नेहरूंचे भारत स्वतंत्र झाल्या नंतरचे उद्गार आहेत.
जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा’ या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल.
स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. भारत जगतील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतू विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज ७४ वर्षाच्या स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. (अपवाद काही धार्मिक संघटना) भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वत: चा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातयं. भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किबंहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का??? असो खूप खोल विषय आहे हा म्हणून आजच्या मंगल दिनी वादाचे विषय बाजूला ठेवून आन्दाचे क्षण साजरे करू या
आपल्या सर्वांना भारताच्या ७४व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा



या दिवसाला साजेशी माहिती
ReplyDeleteजय हिंद
ReplyDeleteवंदे मातरम
खूप छान
ReplyDeleteजय हिंद
ReplyDeleteवंदे मातरम
शाळेची आठवण आली, आणि तुम्ही वर्णन पण माझ्याच शाळेचे केले आहे त्यामुळे अंगावर शहारे आले.
ReplyDeleteछान! शालेय जीवनाची आठवण झाली.
ReplyDelete